‘गेट-टुगेदर’साठी निघालेल्या महिला डॉक्टरांवर काळाचा घाला; 11 प्रवाशांचा मृत्यू

मृतांमध्ये 9 महिलांचा समावेश

बंगळूर – कर्नाटकमध्ये शुक्रवारी एका भीषण अपघातात 11 प्रवासी मृत्युमुखी पडले, तर 9 जण जखमी झाले. मृतांमध्ये 9 महिलांचा समावेश आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे.

Dharwad Accident । “जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा…” – बचावलेल्या महिलेने सांगितली भयकथा

कर्नाटकमधील काही रहिवासी मिनी-बसमधून गोव्याला निघाले होते. त्यावेळी धारवाड शहरालगत त्यांच्या मिनी-बसची समोरून आलेल्या टिपरशी जोरदार धडक झाली.

दावणगिरी येथील डॉक्टर्स महिला मंडळाचा 16 डॉक्टरांचा चमू एका कार्यक्रमासाठी गोव्याला जात होता,यातील बहुतांश महिला डॉक्टर्स या स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याचे समजते.

अपघातानंतर तातडीने मदत आणि बचाव कार्य हाती घेण्यात आले. त्यामध्ये स्थानिकही सहभागी झाले. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले. मृतांमध्ये मिनी-बसच्या चालकाचाही समावेश आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी अपघातातील जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.