आरकेएस भदोरिया भारतीय हवाई दलाचे नवीन प्रमुख

बी.एस धनोआ यांच्या निवृत्तीनंतर स्विकारला पदभार

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या प्रमुख पदाचा आरकेएस भदोरिया यांनी आज पदभार स्विकारला आहे. बी.एस.धनोआ यांच्या निवृत्तीनंतर आज भदोरिया यांची या पदावर निवड करण्यात आली आहे. दरम्यान भदोरिया यांनी  दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देत शहिदांना श्रद्धांजली वाहिली.

राकेश कुमारसिंग भदोरिया हे 36 राफेल विमान खरेदीसाठी तयार केलेल्या वाटाघाटी पथकाचे एक भाग होते. राकेश कुमारसिंग भदोरिया हे भारतीय हवाई दलातील एक उत्तम पायलट आहेत. त्यांनी आतापर्यंत राफेलसह 28 पेक्षा जास्त प्रकारची लढाऊ आणि वाहतूक विमानांची उड्डाण केली आहे. एअर मार्शल भदोरिया प्रायोगिक चाचणी पायलट होण्याबरोबरच कॅट ‘ए’ प्रकारातील पायलट फ्लाइंग इंस्ट्रक्‍टर आणि पायलट अटॅक इन्स्ट्रक्‍टर आहेत. त्यांच्या कार्यक्षम क्षमतेमुळे त्यांना सन 2002 मध्ये वायुसेना पदक, 013 मधील अति विशिष्ठ सेवा पदक आणि 2018 मध्ये परम वशिष्ठ सेवा पदक देण्यात आले. राकेश कुमारसिंग भदौरिया हे भारतीय वायुसेनेच्या जग्वार पथक प्रमुख आणि दक्षिण-पश्‍चिम सीमेवरील प्रमुख हवाई दलाचे प्रमुख देखील राहिले आहेत. एअर मार्शल भदोरिया हे विमान आणि प्रणाल्या चाचणी आस्थापना येथे फ्लाइट टेस्ट स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर देखील होते. याच संस्थेने एलसीए तेजस या भारताची पहिली स्वदेशी लढाऊ विमानाची प्राथमिक उड्डाणे केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)