लालू प्रसाद यादव तुरुंगातून ठरवणार राजद चे उमेदवार – प्रदेशाध्यक्ष रामचंद्र पूर्वे

पाटना (बिहार) : आगामी लोकसभा निवडणुकीसांठी राजद (राष्ट्रीय जनता दल) चे पक्षाध्यक्ष लालू यादव तुरुंगातूनच उमेदवार ठरवणार आहेत. राजदचे प्रदेशाध्यक्ष रामचंद्र पूर्वे यांनी ही माहिती दिली आहे. शनिवारी राजदच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे रामचंद्र पूर्वे यांनी सांगितले.

या बैठकीत माजी मुख्यमंत्री राबडीदेवी, माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, मीसा भारतीसह राजदच्या अनेक बड्या नेत्यांनी भाग घेतला . आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड आणि जागावाटप यांचे सर्वाधिकार अध्यक्ष लालू प्रसाद यांना देण्यात आले आहेत.

शनिवारी झालेल्या बैठकीत एकूण चार ठराव संमत करण्यात आले. उमेदवारांची निवड, समविचारी पक्षांबरोबर समझोता आणि जागावाटपाचे अधिकार अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना देण्यात आले आणि बिहारच्या सर्व, 40 जागांवर महागटबंधनाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी नेत्यांना सहकार्य करण्याचा ठराव संमत करण्यात आला.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर या वर्षी होळी सण साजरा न करण्याचा ठराव संमत करण्यात आला आहे. चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव रांची येथील तुरुंगात असून सध्या रांची येथील एका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.