RJD नेत्यांनी केली तालिबान्यांची तुलना ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी’ म्हणाले,’हे तर भारतामधील तालिबानी’

नवी दिल्ली –  अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता काबीज केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर  बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी  तालिबानची तुलना  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी केली आहे.

पाटण्यातील पक्ष कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना केलेल्या भाषणात जगदानंद यांनी हे  वादग्रस्त वक्‍तव्य केले आहे. सध्या या संबंधित घटनेचा व्हिडियो चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडियोमध्ये ते म्हणाले,’तालिबान हि एक संस्कृती जी अफगाणिस्तानमध्ये आहे. तर आरएसएस हे भारतामधील तालिबानी आहेत. संघाचे लोक लोकांना हिंसा करण्यासाठी प्रवृत्त करते. 

ते पुढे म्हणाले,’ आरएसएसची वाईट विचारसरणी भारतामधील संस्कृतीमध्ये फूट पाडण्याचं काम करत असल्याच्या आरोपही त्यांनी लगावला आहे.’ असेही ते म्हणाले आहे.
जगदानंद यांचा वक्‍तव्यांवर त्यांना  ट्रोल केले जाते. असले तरी राष्ट्रीय जनता दलाचे नेते जगदानंद यांचं यासंदर्भात समर्थन करताना दिसत आहेत. पक्षाचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी जगदानंद यांचं वक्तव्य कोणत्याच पद्धतीने चुकीचं नसल्याचं सांगत त्यांची पाठराखण केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.