बिहारमध्ये राजद 20 तर काँग्रेस 9 जागांवर लढणार !

पाटणा: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशपातळीवर उमेदवार घोषित करण्यात येत आहेत. कोणता पक्ष कोणता उमेदवार देईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राजदचे प्रदेशाध्यक्ष रामचंद्र पुर्वे यांनी पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप व उमेदवारांची यादी जाहीर केली.

बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, हिंदुस्थानी आवाम मोर्चा, राष्ट्रीय लोक समता पार्टी या पक्षांच्या महायुतीने आज त्यांचे जागावाटप जाहीर केले. बिहारमध्ये राजद 20 जागांवर तर काँग्रेस 9, हिंदुस्थानी आवाम मोर्चा 3, राष्ट्रीय लोक समता पार्टी 5, वीआईपी 3, सीपीआय 1 जागांवर निवडणूक लढवणार आहे.

तसेच शरद यादव आरजेडीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात आले. आणि जीतनराम मांझी गया मधून लढणार आहेत.

https://twitter.com/ANI/status/1109049792083034112

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)