अलिबाग – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सातत्याने चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे ‘रिया चक्रवर्ती’. मात्र रिया आता एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच रियाने इन्स्टाग्रामवर अलिबागमधील सुटय़ांचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
यात तिने तिच्या हॉलिडे होमची झलक दाखवली आहे. त्यासोबतच ती तिच्या सुटय़ा छान एन्जॉय करत असल्याचेही दिसत आहे. रियाने शेअर केलेल्या या व्हिडीओ ती अलिबागमधील एका व्हिलामध्ये असल्याचे दिसत आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये ती अलिबागमधील स्विमिंग पूलजवळच्या पायऱयांवर चालताना दिसत आहे. त्यानंतर तिने तिच्या खोलीची झलकही दाखवली आहे. ही खोली सर्व सुविधांनी सुसज्ज असल्याचे दिसत आहे.
View this post on Instagram
अलिबागमध्ये रिया चक्रवर्ती ज्या व्हिलामध्ये सुट्टी घालवत आहे. त्या व्हिलामध्ये 6 बेडरूम आहेत. त्यासोबत लॉन आहे. विशेष म्हणजे या व्हिलाला एक स्विमिंग पूलही पाहायला मिळत आहे.
दरम्यान, रिया चक्रवर्ती राहत असलेल्या तो व्हिला प्रशस्त आहे. यातील प्रत्येक खोलीचे एका रात्रीचे भाडे 32 हजार 500 रुपये आहे. याव्यतिरिक्त . रिया गेल्यावषी ‘चेहरे’ चित्रपटात दिसली होती. यात अमिताभ बच्चन, क्रिस्टल डिसूझा आणि इमरान हाश्मी यांनी भूमिका केल्या होत्या.