मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सतत चर्चेत असते. सुशांत प्रकरणी पुढे आलेल्या ड्रग्ज प्रकरणात रियाचे नाव समोर आले होते. यानंतर तिला अटकही करण्यात आली होती. सध्या रिया जामिनावर असून तिच्या अडचणी कमी होत नसल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी रियासह तिचे आई-वडील नवीन ठिकाणी शिफ्ट होणार होते. ड्रग्ज प्रकरणात तिचे नाव समोर आल्याने सोसाटीने तिला घर सोडण्यास सांगितले होते.
View this post on Instagram
दरम्यान, अनेक संकटांचा सामना करणारी रिया आता पुन्हा नव्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 2021 मध्य़े रियाचा ‘चेहरे’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रिया अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मीसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. रिया आता मागचं सर्व काही विसरून तिच्या जीवनाची नव्याने सुरूवात करणार आहे. ‘चेहरे’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी रूफी जाफरी यांच्य़ा खांद्यावर आहे.
View this post on Instagram
सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येला 6 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. या प्रकरणी सीबीआय, ईडी आणि एनसीबीकडून अद्यापही तपास सुरू आहे. तसेच ही आत्महत्या आहे की हत्या आहे, हेही सीबीआयकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.
View this post on Instagram