मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतप्रकरणी एनसीबीकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीला दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून एनसीबीकडून रियाची चौकशी सुरू होती. त्यानंतर एनसीबीने रियावर अटकेची कारवाई केली. तिला न्यायालयात हजर केले असता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, रियाला अटक झाल्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली असता. त्याविरोधात तिने जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, आता रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज फेटाळला असून रियाला 22 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीच राहावं लागणार आहे.
Once we get the order copy. We will decide next week on the course of action on approaching the High Court: Rhea Chakraborty’s lawyer Satish Maneshinde https://t.co/aRZNuuYtPG
— ANI (@ANI) September 11, 2020
शोविक चक्रवर्ती, रिया चक्रवर्ती, अब्दुल बासित, झैद विलात्रा, दीपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडा यांचे जामीन अर्ज आज विशेष न्यायालयाने फेटाळले आहेत. तसेच उद्या पुन्हा एकदा रिया न्यायालयात वकिलांमार्फत जामीन अर्ज करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.