मुंबई- अभिनेत्री रिया चक्रवर्तीला 29 दिवसानंतर बुधवारी जामीन मिळाला. सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्यानंतर ती या सगळ्या प्रकरणाचा सामना करत आहे. NCB , CBI च्या सात तासांच्या चौकशीचाही संयम बाळगत सामना केला. जामीन मिळाल्या नंतर तिची आई संध्या चर्कवर्ती यांनी पहिल्यांदाच तिच्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मी एका स्तराला आत्महत्या करण्याचा विचार केला होता. माझ्या दोन्हीमुलांची ही अवस्था पाहणं होत नाही. माझ्या दोन्ही मुलांना कारावस भोगावा लागला आहे. या काही दिवसात आम्हाला जेवणंही गोड लागत नव्हतं, अशी प्रतिक्रिया त्यांनी टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.
तिनं ज्या परिस्थितीचा सामना केला आहे, हे पाहता आता ती यातून कशी सावरेल?’, असा प्रश्न उपस्थित करत आपली मुलगी एक योद्धा आहे, त्यामुळं ती हा प्रसंगही निभावून नेईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. येत्या काळात रियाला या धक्क्यातून सावरण्यासाठी थेरेपी आणि इतरही काही पद्धतींची आपण मदत घेणार असल्याचं त्या म्हणाल्या.