Dainik Prabhat
Friday, February 3, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

ऋतूमितवा

by प्रभात वृत्तसेवा
November 1, 2020 | 12:22 pm
A A
ऋतूमितवा

अकल्पितपणे काही सामोरं यावं आणि आपण आनंदाने थक्‍क व्हावं, असं क्‍वचितच घडतं. आयुष्य, भावना, मन यांची किती गुंतागुंत असते ना! रिमझिमणारे क्षण कधी, तर कधी वादळाची घुसळण. आपण मात्र कधी भिजायचं तर कधी वाऱ्यासोबत भरकटत जायचं…
पत्तोंकी सरसराहट
कानोंमे कुछ इस तरहा फुसफुसाती रही
बरसों, जैसे कोई पंचम का सूर
फुलोंकी अंगडाईयॉं लेते लेते
हवामें घुलमील रहा हो।
जबसे मेरे अंदरकी कविता ने होश सम्हाला..
तबसे उसीकी नज्म गुनगुनाई है।

उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा हेसुद्धा अनुभवच आहेत ना क्षणांचे. विरह, मिलन, वियोग यांचे प्रतिनिधी वाटतात मला हे ऋतू. विरहाचा उन्हाळा मनात मिलनाच्या धुंद सरी जपतो, तर पावसाळा मिलनानंतरचे सृजन. वसंतात फुलणारे बहावा, अमलताश आणि वैशाखाच्या शेवटी बहरणारा गुलमोहर बदलत्या ऋतूचे आणि घुमणाऱ्या परिवर्तन चक्राचे प्रतीक आहेत. वर्षा ऋतूचा सांगाती पाऊस मेघमल्हार गाताना, आज कुणीतरी यावे… ओळखीचे व्हावे…, असे म्हणतो. आपल्या सहस्त्र धारांनी धरतीला ऋतूस्नान करणारा हा पर्जन्यसखा… श्रावणात तिला शृंगारतो, तर शरद ऋतूमधली परिपक्‍वता चांदण्याच्या रूपाने मनाच्या आकाशात जागत राहते. कोजागरती म्हणून आपण आपल्याच या जाणिवांना हाकारत राहतो.

पूर्वी श्रावणात एक आदित्यराणूबाईची कथा वाचली जायची. त्यात दवंडीवाल्याला सांगितलं जायचं, करा रे… हाकारा पिटा रे डांगोरा आणि शोधून काढा विवेकाचे सार… आयुष्यात येणारे अनेक अनुभव हे निसर्गचक्राशी पर्यायाने ऋतूंशी जोडलेले असतात, असं मला वाटतं. श्रावणातली प्रसन्न सकाळ, वैशाखातले रणरणते ऊन, हिवाळ्यातली हुरहुर लावणारी कातर वेळ आपल्या आयुष्यात अनेक आठवणी रुजवून जाते. आपल्या संस्कृतीमधील सणवार, परंपरा आपल्या जीवनाशी निगडित आहेत त्या यामुळेच. आपले विचार मोकळे सोडले की मोकळ्या ढगांसारखे धावतात इकडेतिकडे. तसंच काहीसं होत जातं आणि मन पोचतं भुलाबाईच्या ठाणात. जिथं ती भुलाबाई शोधते आपल्यातच लपलेल्या आपल्या महादेवाला. दऱ्याखोऱ्यांतली रानजाई होऊन निसर्गाशी एकरूप होऊ पाहताना भुलाबाई गात राहते गाणी आपल्या स्वत्त्वाची, अस्तित्वाची अन्‌ रचते भोंडला रानशेवंतीच्या फुलोऱ्यात.

स्त्री तिचं जग आपल्या स्वत:भोवती विणत राहते. आपल्या एकेक आठवणी, सल, आपली माया यांची मऊशार पिसं जोडून ती खोपा बांधते त्याच्यासोबतच्या क्षणांचा. तेच क्षण तिच्या जगण्याचं कारण आणि बळ असतात. स्त्री ज्याच्यावर जीव जडवते ती त्याच्या सुखासाठी कोणतेही दिव्य करून दाखवू शकते. आपल्या इतिहासात, पुराणकथांत अशी अनेक उदाहरणे आहेत. ही भोंडल्याची गाणी तिच्या त्याच सुखदुःखाचं लेणं लेवून सजतात. जी गाणी किंवा कवितांच्या रूपाने जन्म घेतात. कोणत्याही स्त्री कवयित्रीची कविता ही नकळत तिच्याच आयुष्याचे प्रतिबिंब असते. जी शरदाचे चांदणे सजवते, भुलाबाईला नटवते तिच शिशिराची पानगळ ही सोसते.

विरह, मिलन पुन्हा नव्याने विरह मिलन हे चक्र चालूच राहते. सृष्टी ही देखील स्त्री रूपच आहे ना! ऋतूमग्नमध्ये हेच चक्र मांडायचा मी प्रयत्न केला. स्त्री जाणिवां या काही फक्‍त प्रेम, विरह, माया किंवा तिच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या कथा नसतात, तर त्या तिच्या अस्तित्वाच्या, तिच्या जगण्याच्या, तिच्या “स्व’च्या कहाण्या असतात. झाडाचे, पोपटी नव्हाळी पांघरलेले पान जसे कालांतराने अनुभवांच्या छटा वागवत प्रगल्भ होत जाते अन्‌ एक दिवस आपल्या देठापासून विलग होत पुढच्या प्रवासाला निघते. तसेच स्त्रीचे अनुभव असतात. इथे संदर्भ मृत्यूचा नाही तर पुन्हा रुजण्याचा असतो. स्त्री मन असेच असते. अनेक आयाम अनेक कप्पे वागवते. प्रत्येक कप्प्यात एक अबोल, अव्यक्‍त कहाणी लपवलेली असते. हेच सारे कप्पे रिकामे होतात हातात जेव्हा लेखणी हाती असते.
अशाच एका उद्‌ध्वस्त क्षणांत माझ्याही हातात लेखणी आली आणि ती रुजवणारा मेघही. मी लिहित सुटले आकारहिन, अर्थहिन… कधी एकच शब्द, कधी पसाऱ्याचं. आज अशी गत आहे की मी सचैल भिजतेय शब्दांमध्ये. मनाचे सारे सारे रिकामे करतेय. त्या संपवणाऱ्या आणि पुन्हा नव्याने मला जन्माला घालणाऱ्या क्षणाचे सृजन मांडतेय. आता फक्‍त जी शब्दांची साथ मिळालीय ती मला वादळातही कोलमडू देणार नाही.

ऋतू हा शब्द स्त्रीच्या जीवनात वेगवेगळ्या प्रसंगांनी, वेगवेगळ्या संदर्भांनी येतो. तिच्या सृजनात्मक होण्याचा सोहळा हा तिला ऋतू प्राप्त झाला या रुपकाने साजरा होतो. तिच्या ऋतुमती होण्यात तिच्यातल्या मातृत्वाचे बीज लपलेले असते. तिचे आईपण आणि तिच्या पोटी जन्माला येणाऱ्या नवीन जीवाचे स्वागत, फलशोभन व डोहाळे जेवण करून साजरे होते. इतका ऋतू स्त्रीच्या आयुष्याशी एकरूप झालेला आहे. स्त्री या ऋतूंबरोबर जन्मापासून मृत्यूपर्यंत जोडलेली राहते. असा हा ऋतू तिला तिचा मित्र, सखा, सांगाती या रूपात भेटणं हाही दैवयोगच. लहानपणीच्या साऱ्या आठवणी, प्रसंग, प्रेम, मैत्री, सहवेदना अशा भावना मी मांडायचा प्रयत्न केला. सदरचे लेख म्हणजे अनेक रंगांच्या आकारांच्या आठवणींची माळच जणू… जी दैवाने माझ्यासाठी गुंफली… हाच दैवयोग माझ्यासोबत कायम राहो ही अपेक्षा.

मनात
मानसी चिटणीस

Tags: Ritumitavarupgandh

शिफारस केलेल्या बातम्या

रूपगंध : प्रश्‍न चुकीच्या माहितीचा…
रूपगंध

रूपगंध : प्रश्‍न चुकीच्या माहितीचा…

6 days ago
रूपगंध : पेटारा अर्थमंत्र्यांचा डोंगर आव्हानांचा
रूपगंध

रूपगंध : पेटारा अर्थमंत्र्यांचा डोंगर आव्हानांचा

6 days ago
रूपगंध : संघ निवडीचे निकष काय?
रूपगंध

रूपगंध : संघ निवडीचे निकष काय?

6 days ago
रूपगंध :  ऐकुया जरा
रूपगंध

रूपगंध : ऐकुया जरा

6 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

चोराने स्वत:च्याच मृत्यूचा ‘असा’ रचला बनाव, अखेर पोलिसांनी केले गजाआड

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 13 हजार 539 कोटींचा निधी – रेल्वेमंत्री अश्व‍िनी वैष्णव

थंडीचा जोर पुन्हा वाढणार!

जपान-भारत आणि महाराष्ट्र-वाकायामा हे नाते ठरेल आदर्श – मुख्यमंत्री शिंदे

Kasba Assembly By-Election : देवेंद्र फडणवीसांनी घेतली शैलेश टिळक यांची भेट

K Viswanath : सुप्रसिद्ध दिग्दर्शक के. विश्‍वनाथ कालवश

Assembly by-elections : पोटनिवडणूकीबदल जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले “महाविकास आघाडी….”

Pune : अर्चना पाटील यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन

Punjab : खासदार प्रनीत कौर कॉंग्रेसमधून निलंबित

इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे हडपसरमध्ये दंत तपासणी शिबिर

Most Popular Today

Tags: Ritumitavarupgandh

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!