राज कपूर यांची कन्या रितु नंदा यांचे कर्करोगाने निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या. गेल्या काही काळापासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. मंगळवारी सकाळी त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात पती राजन, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती रितु नंदा यांचे भाऊ आणि ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांनी दिली आहे. रितू यांचा जन्म 1948 साली झाला होती. त्या उद्योजिका होत्या. उद्योगपती राजन नंदा यांच्याशी त्यांनी लग्न केलं होतं. राजन नंदा यांनी 2018 साली अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा निखिल नंदा आणि अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन हे पती-पत्नी आहेत.