रितेश देशमुख हा बॉलीवूडमधील अशा कलाकारांपैकी एक आहे जो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. रितेश नेहमी चेहऱ्यावर एक सुंदर हास्य घेऊन चाहत्यांसमोर येतो. रितेश अनेकदा इन्स्टाग्रामवर रील शेअर करत असतो. कधी बायकोसोबत तर कधी एकटा. अलीकडेच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये नेहमीच मस्त दिसणारा रितेश रागात लाल दिसत आहे.
रितेशला पाहून चाहत्यांना वाटतं की त्याला कधी राग येत असले का ? तुम्ही आजपर्यंत या अभिनेत्याला रागात पाहिले नसेल, तर बघा तो रागाच्या भरात काय करतो. रितेशने नुकताच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून तुम्हालाही नवल वाटेल.
रितेशला राग अशा प्रकारे आला की त्याने स्वतःच्या डोक्यात पाणी ओतले. वास्तविक, रितेश देशमुखने एक मजेदार व्हिडिओ बनवला आहे, जो पाहिल्यानंतर चाहते खूप हसत आहेत. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की रितेश व्हॅनिटी व्हॅनमध्ये तयार होतोय. यादरम्यान त्याचा हेअरस्टायलिस्ट त्याच्या केसांवर पाण्याची फवारणी करतो. त्याला त्याची सततची फवारणी आवडत नाही आणि तो रागाने स्प्रे बाटलीचे झाकण उघडतो आणि सर्व पाणी स्वतःवर ओततो.
हेअरस्टायलिस्ट नंतर नवीन स्प्रे बाटली घेऊन येतो आणि पुन्हा फवारणी सुरू करतो. रितेश पुन्हा त्याच्या हातातून बाटली घेतो आणि दुसऱ्यांदा पूर्ण बाटलीही त्याच्या डोक्यात ओततो. या मजेदार व्हिडिओसोबत त्याने कॅप्शन लिहिले आहे – ‘मी शूटसाठी तयार आहे.
View this post on Instagram
केवळ चाहतेच नाही तर सेलिब्रिटीही या व्हिडिओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओ पाहून फराह खानला हसू आवरता आले नाही. कमेंट करताना त्यांनी लिहिले – हाहाहाहा तुमचे एक्सप्रेशन खूप छान आहेत. अमिषा पटेलनेही खूप हसणारे इमोजी पोस्ट करून प्रतिक्रिया दिली आहे.