Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या मंचावर ‘खेल खेल में’ या चित्रपटाची टीम कल्ला करणार आहे. त्यांच्या कल्ल्याने रविवारचा ‘भाऊचा धक्का’ एकदम झापुक झुपुक होणार आहे. कालच्या भागात भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने सदस्यांना चांगलाच धडा शिकवला.
तर काहींचं कौतुक केलं. आता घरातील खिलाडींना भेटायला भाऊच्या धक्क्यावर खास बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार हजेरी लावणार आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये भाऊच्या धक्क्यावरुन अक्षय कुमार वर्षाला म्हणतोय,”वर्षा किती वर्षांनी दिसतेस”. त्यानंतर डीपीला विचारतो,”घरात मटन मिळतंय की नाही”.
त्यानंतर सूरजच्या स्टाईलने भाऊच्या धक्क्यावर रितेश आणि खिलाडी कुमार झापुक झुपुक थिरकताना दिसतात. एकंदरीतच आजचा भाऊचा धक्का एकदम ‘खेल खेल में’ स्टाईलने होणार आहे.
अक्षय कुमारसह फरदीन खान, वाणी कपूर, अम्मी विर्क, प्रज्ञा जायसवाल आणि आदित्य सील हे कलाकारदेखील ‘भाऊच्या धक्क्या’वर हजेरी लावणार आहेत. अक्षय कुमारच्या येण्याने भाऊच्या धक्क्याला एक वेगळाच रंग येणार आहे.
हे देखील वाचा….