Riteish Deshmukh And Jenelia Dsouza| अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया डिसूझा-देशमुख ही बॉलीवूडची लोकप्रिय जोडी आहे. दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. त्यांच्या कॉमेडी व्हिडिओला चाहत्यांची देखील चांगलीच पसंती मिळते. यातच आता रितेश आणि जिनिलियाने आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.
रितेश आणि जिनिलिया यांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनने (NOTTO) व्हिडीओ शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे NOTTO ने रितेश आणि जिनिलियाचे आभार मानले आहेत. मागील बऱ्याच काळापासून दोघेही अवयव दानाचा विचार करत होते. अखेर त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. यावेळी त्यांनी नागरिकांनाही अवयवदान करण्याचे आवाहन केले आहे.
Thanks to Riteish Deshmukh & Genelia, the Bollywood star couple for pledging to donate their organs during the ongoing organ donation month of July. Their gesture will motivate others also to connect with the noble cause.#organdonation #Bollywood #savelives pic.twitter.com/lJ1Yiyaj1o
— NOTTO (@NottoIndia) July 6, 2024
या व्हिडीओमध्ये रितेश म्हणतो की, आम्ही आमचे अवयव दान करण्याची प्रतिज्ञा केली आहे.त्यानंतर जिनिलिया म्हणते, ‘हो आम्ही आमचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्यासाठी दुसऱ्यांना जीवन देण्याइतकी मोठी गोष्ट नाही. आमच्या आयुष्यातील सर्वांत सुंदर भेट आहे. यापेक्षा चांगली भेट अजून काही असूच शकत नाही. त्यामुळे आम्ही तुम्हालाही आवाहन करतो की तुम्हालाही असं दान करायचं असेल तर विचार करू नका. तुम्हीही ही प्रतिज्ञा घ्या.” यानंतर त्यांचे या निर्णयाचे सर्वांकडून कौतुक केले जात आहे.
रितेश आणि जिनिलियाप्रमाणेच याआधी इतर सेलिब्रिटींनीही अवयवदानाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, रितेश देशमुख अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि साकिब सलीम स्टारर ‘ककुडा’ चित्रपटात दिसणार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर चाहतेही या चित्रपटाबाबत उत्सुक आहेत.
हेही वाचा:
BIG BREKING…! बच्चू कडू – संभाजीराजे एकत्र लढणार ‘विधानसभा निवडणुक’ ?