मुंबई – मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी म्हणजेच, अभिनेत्री जेनेलिया यांच्या ‘वेड’ चित्रपटातने सध्या तरी सर्वांनाच वेड लावल्याचं दिसून येत आहे. सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची चांगलीच चर्चा होत असून, फॅन्सला देखील ही जोडी आवडली आहे. 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘वेड’ चित्रपटाने सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांना देखील हा चित्रपट आवडला असून, रितेश आणि जेनेलिया यांना डोक्यावर घेतलं आहे.
दरम्यान, 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या बहुचर्चित चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवलेला आहे. त्यांच्या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली असून, या चित्रपटापुढे बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांचीही अवस्था वाईट झाली आहे. भलेभले बिग बजेट चित्रपट सध्या फ्लॉप होत असून रितेश आणि जिनिलियाची जोडी मात्र हिट झाली आहे.
View this post on Instagram
मात्र, या चित्रपटाची एका दिवसाची कमाई पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्यात. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात तब्बल 20.18 कोटींची कमाई करत सर्वांनाच थक्क केलं होतं. तर दुसऱ्या आठवड्यात 20.67 कोटींची कमाई केली आहे. नव्या रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने रिलीजच्या 18 व्या दिवशी 1.4 कोटींची कमाई केली आहे. आता या चित्रपटाने एकूण तब्बल 50 कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर एक नवा रेकॉर्ड केला आहे.
दरम्यान, याविषयी सांगताना वेड चित्रपटाचा अभिनेता रितेश देशमुख याने एक पोस्ट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. रितेश आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हणाला, “शब्द अपुरे पडत आहेत!!! वेड चित्रपटाला मोठ्या मनाने आपण स्वीकारले आणि भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुम्हा प्रेक्षकांचे कोटी कोटी आभार.!” असं तो म्हणाला आहे. सर्वच स्तरातून आता या चित्रपटाचे कौतुक होत आहे.