मुंबई – अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूजा हे जोडपं सोशल मीडियावर कायम अॅक्टीव्ह असतं. महाराष्ट्रात या या जोडीचे मोठ्या प्रमाणात आहेत. रितेश-जेनिलिया देखील सतत नवनवीन व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांचा आता होळी स्पेशल व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
रितेश आणि जेनेलियाने मुलांसोबत सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा देताना एक व्हिडीओ शेअर केला आहे. एवढचं नाही तर शुभेच्छा दिल्यानंतर ते सगळे बलम पिचकारी गाण्यावर त्या क्षणाचा आनंद घेताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
रितेशने हा व्हिडीओ त्याच्या फेसबूकवर शेअर करताच लोकांचे भरभरुन प्रतिसाद येऊ लागले. एवढचं नाही तर या व्हिडीओला 2 लाखांपेक्षा जास्त लाईक्स आहेत. तसेच हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात फाॅरवर्ड केला जात आहे.