स्लीप ऍप्नियाचा धोका

डॉ. अमेय उद्यवार
तुम्ही जगभरातील स्लीप ऍप्नियाने पीडित लोकांपैकी एक असाल तर तुम्ही निराशाजक, दुर्बल आणि जीवन बदलणारी स्थिती कशी असू शकते हे तुम्ही जाणता. झोपेचा अभाव, अवधानाचा अभाव, थकवा आणि स्मरणशक्‍ती कमी होणे यांचा यात समावेश असू शकतो. तुमचा जोडीदार मोठमोठ्याने घोरत असेल, रात्रीच्या वेळी सतत उठत असेल आणि दिवसा त्याची चिडचिड होत असेल, तर तुम्ही त्याला समजून घेतले पाहिजे. कार्डियक रेसिंक्रनायझेशन थेरपी डिफिब्रिलेटर (सीआरटी-डी) पेसमेकर इम्प्लाण्ट असलेल्या हार्ट पेशंट्‌समध्ये निदान न करण्यात आलेला स्लीप ऍप्निया आजार मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे.

हृदय रूग्णांमध्ये स्लीप ऍप्नियाचे प्रमाण 25 टक्‍क्‍यांहून अधिक आहे. यामध्ये औषध-प्रतिरोधक उच्च रक्‍तदाब, कोरोनरी आर्टरी डिसीज, हार्ट फेलर, मधुमेह, आर्तेरियल फायब्र्रिलेशन, अचानक हृदयक्रिया बंद होऊन मृत्यू ओढावणे, हृदयाघात आणि औदासिन्यता यांचा समावेश आहे. झोपेचा कालावधी आणि प्रमाण यातील फरकामुळे मध्यम व गंभीर स्लीप ऍप्नियामुळे कार्डियोव्हॅस्कुलर डिसीजचा उच्च धोका निर्माण होतो. स्लीप ऍप्निया हा झोपेचा गंभीर आजार आहे. या आजारात श्‍वासोच्छ्वास सतत चालू-बंद होत असतो. एकूण तीन प्रकारचे स्लीप ऍप्निया आहेत : ऑब्ट्रक्‍टिव्ह स्लीप ऍप्निया (ओएसए), हा अधिक सामान्य आजार घशातील मांसपेशी कमी कार्यरत झाल्यानंतर होतो. सेंट्रल स्लीप ऍप्निया (सीएसए) हा आजार श्‍वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवणाऱ्या मांसपेशींना मेंदू योग्य संकेत देत नाही तेव्हा होतो. जटिल स्लीप ऍप्निया सिंड्रोम हा आजार ओएसए आणि सीएसए हे दोन्ही असल्यावर होतो.

ओएसए हा झोपेचा आजार अधिक लोकांमध्ये आढळून येतो. या आजारामध्ये व्यक्‍तीचा त्याच्या/तिच्या झोपेदरम्यान अधिक वेळा श्‍वास थांबतो. जागतिक मार्गदर्शकतत्त्वांनुसार झोपेदरम्यान 5 सेकंदांपेक्षा अधिक वेळ श्‍वास थांबून राहिला तर ती चिंतेची बाब आहे. श्‍वास थांबतो तेव्हा मेंदू व्यक्‍तीला उठण्याचे संकेत देतो, ज्यामुळे ते पुन्हा श्‍वासोच्छ्वास क्रिया सामान्य करू शकतील. पण झोपल्यानंतर व्यक्‍तीला घोरणे आणि घाम येणे अशी लक्षणे जाणवत नाहीत. पण दिवसा थकवा, कंटाळा येणे, थकलेले वाटणे, स्मरणशक्‍ती कमी होणे व डोकेदुखी अशी लक्षणे जाणवतात. मजगभरातील 5 दशलक्षहून अधिक लोकांमध्ये स्लीप ऍप्निया आढळून आला आहे. हे प्रमाण तीन पट अधिक आहे.

आधुनिक काळातील पेसमेकर्सनी झोपेसंदर्भातील आजारांचे निदान करण्यासाठी मदत करण्यामध्ये सुलभता आणली आहे. ज्यामुळे डॉक्‍टरांना लवकरात लवकर उपचार सुरू करणे सोपे झाले आहे. खरेतर हार्ट पेशंट्‌ससाठी श्‍वासोच्छ्वासाची देखरेख करण्यासाठी, त्याअनुषंगाने गती समायोजित करण्यासाठी आणि झोपेदरम्यान रूग्णाच्या एकूण हार्ट फेलर स्थितीसंदर्भात साह्य करण्यासाठी सेन्सर्ससह पेसमेकर्स तयार करण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.