#व्हिडिओ: खेड सेझमध्ये उत्खननामुळे भूस्खलनाचा धोका

ग्रामविकास प्रतिष्ठानचा आरोप : न्यायालयात याचिका दाखल करणार

पाबळ/दावडी – खेड तालुक्‍यातील एसईझेड प्रकल्पात होत असलेल्या बेकायदेशीर उत्खननामुळे भूस्खलना धोका वाढला आहे. याबाबत मंत्री, जिल्हाधिकारी, संबंधित खात्याचे अधिकारी यांचेकडे रीतसर दाद मागूनही न्याय मिळत नसल्याचे पार्श्‍वभूमीवर येथील ग्रामविकास प्रतिष्ठानचे माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक टाव्हरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान या गैरप्रकारातून तब्बल दहा कोटी रुपये रक्‍कम चुकवण्यासाठी एसईझेड व शासकीय अधिकारी संगनमताने प्रयत्नशील असून, गेली वर्षभर प्रयत्न करूनही दाद मिळत नसल्याने व शासनाचा महसूल चुकवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असल्याचा आरोप अशोक टाव्हरे यांनी केला. आजही हे उत्खनन सुरू असल्याचे पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिली. न्याय मिळण्याच्या आशा संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत असल्यानेच (पान 3 पहा)8

या प्रकरणात शासनाचा आठ ते दहा कोटींचा महसूल वसूल व्हावा ही आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे या भागातील गावांना भूस्खलनाचा धोका असल्याने, राजरोस होत असलेल्या उत्खनन करणारांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
-अशोक टाव्हरे, अध्यक्ष ग्रामविकास प्रतिष्ठान खेड

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)