क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी आढळणाऱ्या बसेसवर कारवाई
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात एसटी बसवर आरटीओचे धाडसत्र सुरू केले आहे. एसटीकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या संभाजी ब्रिगेडच्या तक्रारी नंतर जिल्ह्यात कारवाई सुरू झाली आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी आढळणाऱ्या बसवर कारवाई सुरू केली आहे. आज सकाळपासून कोल्हापूर प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गिरगाव परिसरातून मिरजकर तिकटी परिसरात येणाऱ्या बसेसची तपासणी केली. या तपासणी दरम्यान त्यांना क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करत असल्याचे आढळून आले आहे.
संभाजी ब्रिगेडच्या तक्रारीनंतर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी ही तपासणी मोहीम सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात मिरजकर तिकटी परिसरातून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या बसची तपासणी करण्यात येत आहे.