मुंबई – जागतीक बाजार सोन्याचे दर वाढल्यामुळे रुपयाचे मुल्य कमी झाल्यानंतर भारतीय बाजारात बुधवारी सोन्याच्या दरात वाढ नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 264 रुपयांनी वाढून 45,123 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 362 रुपयांनी वाढून 58,825 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
सकाळच्या सत्रात रुपयाचे मुल्य 13 पैशांनी कमी झाले होते. त्यामुळे आयात महाग होते. जागतीक बाजारात सोन्याचे दर वाढून 1,739 डॉलर तर चांदीचा दर 22.26 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेले.
गेल्या काही दिवसांत सोन्याचे दर कमी होऊन सोन्याचे दर सात आठवड्याच्या निचांकी पातळीवर गेले होते. आता त्यात सुधारणा झाली आहे. मात्र आता आर्थिक परिस्थिती सुधारत असल्यामुळे सोन्याच्या दरावर दराबर दबाव राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.