‘ऋषी कपूर’ मायदेशी परतले

मुंबई – बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर गेले काही महिने न्यूयॉर्कमध्ये आहेत. न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांचे कुटुंबीय त्यांच्या प्रकृतीची माहिती सतत सोशल मीडियावर देत असतात. न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांच्या चौकशीसाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपूर्वी ऋषी कपूर यांनी आपल्या मातृभूमीची आठवण येत असल्याचे सोशल मीडियाद्वारे म्हटले होते. अनेकदा त्यांनी भारतात परत येण्याची इच्छादेखील व्यक्त केली होती.

दरम्यान, आता ऋषी कपूर आपल्या मायदेशी परतले असून, त्यांचे विमानतळावरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी ऋषी कपूर यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. ऋषी कपूर त्यांच्यासोबत त्यांची पत्नी नीतू कपूरदेखील हजर होत्या. तसेच ऋषी कपूर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटद्वारे ते भारतात परतत असल्याचे सांगितले. ’11 महिने 11 दिवसानंतर मी घरी परतलो’. असं त्यांनी ट्विटर मध्ये म्हंटल आहे.

 

View this post on Instagram

 

Welcome back ❤❤❤ #rishikapoor #neetusingh #airportdiaries #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

Leave A Reply

Your email address will not be published.