लंडन – ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांच्या राज्यारोहणाच्या शाही सोहळ्यानिमित्त ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ब्रिटनमधील बॅंकांना 6 मे 2023 रोजी एक दिवसाची सुटी जाहीर केली आहे. 73 वर्षीय राजे चार्ल्स – तिसरे यांनी सप्टेंबर महिन्यात महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर राज्यपदाची सूत्रे स्विकारली आहेत.
पण महाराणींच्या अंत्यसंस्कारापूर्वी राजेपदाची सूत्रे स्विकारणे आवश्यक असल्यामुळे तो एक औपचारिकतेचा भाग होता. मात्र चार्ल्स यांच्या राज्यारोहणाचा अधिकृत सोहळा पुढील वर्षी होणार आहे. त्या आनंदोत्सवात सहभागी होण्यासाठी ऋषी सुनक यांनी ही सुट्टी जाहीर केली आहे.
दिनांक 8 मे 2023 रोजी राजे चार्ल्स – तिसरे यांच्या राज्यारोहणाचा शाही सोहळा होणार आहे. हा ब्रिटनसाठी एक मोठा आणि ऐतिहासिक क्षण असणार आहे. त्यानिमित्त देशातील सर्व बॅंकांचे कामकाज एक दिवस बंद ठेवण्यात येणार आहे, असे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आज जाहीर केले.
Gujarat Assembly Election 2022 : केजरीवालांचा ‘तो’ दावा भाजपने फेटाळला
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या राज्यारोहणाच्यावेळी 1953 सालीही ब्रिटनमधील बॅंकांना सुटी देण्यात आली होती. त्या रितीला अनुसरुन सुनक यांनी ही सुटी जाहीर केली आहे.