मुंबई – सध्या राजधानी दिल्लीत सर्वत्र हवा प्रदुषण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे दिसत आहे. त्यातच आजपासून दिल्लीत प्रदूषण टाळण्यासाठी सम-विषमचा नियम लागू करण्यात आला आहे. दरम्यान, दिल्लीतल्या या प्रदूषणावर बॉलिवूड मधील कलाकारांनी देशील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी कोणतंही भाष्य न करता सोशल मीडिया पोस्टमधून आपली प्रतिक्रिया मांडली आहे. ‘भीती वाटत असेल, हृदयाचे ठोके वाढले असतील आणि डोळे पाणावले असतील तर तुम्ही एक तर प्रेमात आहात, किंवा दिल्लीत’. अशी पोस्ट कपूर यांनी केली आहे.
True that! pic.twitter.com/IjflixScMh
— Rishi Kapoor (@chintskap) November 3, 2019
दरम्यान, अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही इंस्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला असून, ज्यात तिने मास्क घातलेलं आहे. तिने प्रदूषणावर चिंता व्यक्त करत बेघर लोकांसाठी प्रार्थना करण्याचं देखील आवाहन केलं आहे.