ऋषी कपूरची जवळपास वर्षभरानंतर घरवापसी

न्यूयॉर्कमध्ये दीर्घकाळ उपचार घेतलेले अभिनेते ऋषी कपूर रविवारी मुंबईला परतले. तब्बल 11 महिने आणि 11 दिवसांनी त्यांची घरवापसी झाली आहे. त्यांच्या समवेत पत्नी नीतू सिंहदेखील होत्या. मुंबई विमानतळावर उतरल्यावर ऋषी कपूर यांच्या चेहऱ्यावर मायदेशी परतल्याचा आनंद दिसत होता. मुंबईला परतल्यावर ऋषी कपूर यांनी लगेचच ट्‌विटरवरून आपले स्टेटस अपडेट करून टाकले.

आपण 11 महिने 11 दिवसांनी घरी परतलो आहोत असे त्यांनी आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे आणि शुभेच्छांसाठी सर्वांचे आभारही मानले आहेत. सध्या न्यूयॉर्कमध्ये असलेल्या अनुपम खेर यांनी या दाम्पत्याला माघारीच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्या दोघांबरोबर न्यूयॉर्कमध्ये छान वेळ गेल्याचेही अनुपम खेर यांनी म्हटले आहे.

जवळपास वर्षभरापूर्वी न्यूयॉर्कमध्ये उपचारांसाठी आलेल्या ऋषी कपूर यांना भेटण्यासाठी बॉलिवूडमधील करण जोहर, दीपिका पदुकोण, विकी कौशल, बोमन इराणी, आमिर खान, आलिया भट, सुनिल शेट्टी, प्रियांका चोप्रा, सोनाली बेंद्रे आणि जावेद जाफरी यांच्यासारखे सेलिब्रिटी येऊन गेले आहेत. त्यांच्या समवेतचे सेल्फी ऋषी कपूर यांनी सोशल मिडीयावर प्रसिद्धही केले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)