नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना संसर्ग झाला असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. तसेच त्यांनी प्रकृती स्थीर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
ऋषी कपूर गेल्या वर्षी कर्करोगावर उपचार घेण्यासाठी न्यूयॉर्कला गेले होते. जवळपास 11 महिन्यांनंतर ते गतवर्षी सप्टेंबरमध्ये भारतात परतले होते. पण आता त्यांची तब्येत पुन्हा बिघडली असून त्यांना दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबद्दल नीतू यांना कळताच त्या तातडीने दिल्लीत पोहोचल्या आहेत. तसेच मुंबईहून रणबीर कपूरसह अभिनेत्री आलिया भट्टही दिल्लीला रवाना झाले आहेते.