ऋषभ पंतची विस्फोटक खेळी

ऋषभ पंतच्या 73 धावा आणि लोकेश राहुलची 42 धावांची खेळीच्या जोरावर भारत अ संघाने इंग्लंड लायन्सचा 6 गडी राखून पराभव केला आहे. त्याचबरोबर भारत अ संघाने इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध पाच अनाधिकृत एकदिवसीय सामान्यांच्या मालिकेत 4-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

या मालिकेतील चौथ्या सामन्यात भारत अ संघाकडून खेळताना ऋषभ पंतने धडाकेबाज खेळी केली. त्याने 76 चेंडूत 73 धावा ठोकल्या. यात 6 चौकार आणि 3 षटकार लगावत त्याने ही खेळी साकारली या सामन्यात इंग्लंड लायन्स संघाने 221 धावा केल्या होत्या. भारत अ संघाने सामना 47व्या षटकातच जिंकला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)