ऋषभ पंतचे दिवसच वाईट

राजकोट: एखाद्या खेळाडूच्या बाबतीत काही गोष्टी विपरीत घडू लागल्या की त्याला सातत्याने टीकेला सामोरे जावे लागते. भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतच्याबाबत देखील हेच घडत आहे.

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात पंतकडून पुन्हा एकदा चूक झाली आणि त्याचा फटका संपूर्ण संघाला बसणार का असा प्रश्‍न निर्माण झाला. पण दासने पुन्हा एकदा असाच प्रयत्न केला आणि यावेळी मात्र पंतने कोणतीही चूक केली नाही व दासला धावबाद केले.

बांगलादेशचा सलामीवीर लिंटन दास यजुर्वेंद्र चहलच्या गोलंदाजीवर पुढे सरसावत मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चुकला आणि यष्टीरक्षक पंतकडे चेंडू गेला त्याने त्वरित त्याला यष्टीचीत केले मात्र हा निर्णय मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचाकडे सोपविला.

चेंडू पकडताना पंतचे हात यष्टीच्या पुढे आल्याचे स्पष्ट झाल्याने लिंटन दासला पंचांनी नाबाद ठरविले तसेच हा चेंडू देखील नो-बॉल ठरवत दासला जीवदान दिले. इतक्‍या मोठ्या आणि महत्त्वाच्या सामन्यात अशी चूक पंतकडून घडली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)