#AUSvIND : अन् पंतने मोडला धोनीचा विक्रम…

ब्रिस्बेन : नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत कर्णधार अजिंक्‍य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात कसोटी मालिकेत पराभूत करत ऐतिहासिक कामगिरी केली. या विजयाचा शिल्पकार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत ठरला. त्याने नाबाद 89 धावांची खेळी करत यजमानांचे सर्व मनसुबे उद्‌ध्वस्त केले. ( Rishabh Pant breaks MS Dhoni’s record )

दरम्यान, याच सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने  एक विक्रम आपले नावे केला आहे. ब्रिस्बेन कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात एक धाव घेताच ऋषभ पंतनं कसोटीत एक हजार धावा पूर्ण केल्या आणि कसोटीत सर्वात जलद एक हजार धावांचा टप्पा गाठणारा भारतीय यष्टीरक्षक ठरण्याचा बहुमान त्याने मिळवला. याआधी हा विक्रम माजी कर्णधार व यष्टीरक्षक एम.एस. धोनीच्या नावावर होता. 

ऋषभ पंतनं 27 व्या डावांत 1000 धावा करण्याचा  विक्रम केला आहे तर धोनीनं 32 डावांत कसोटीमध्ये 1 हजार धावा केल्या होत्या. यासह धोनीनं माजी यष्टीरक्षक फारुख इंजिनिअरचा विक्रम मोडीत काढला होता. फारुख इंजिनिअर यांनी 36 डावांत एक हजार धावा केल्या होत्या.  तर भारताचा यष्टीरक्षक वृद्धीमान साहानं 37 डावांत ही कामगिरी केली होती. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.