नवी दिल्ली – जागतिक बाजारात अनिश्चित परिस्थिती असल्यामुळे सोने ( Gold Price Today ) आणि चांदीच्या ( Silver Price Today ) दरात सोमवारी वाढ नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचे दर 185 रुपयांनी वाढून 49,757 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. दिल्ली सराफात तयार चांदीचा दर 1,322 रुपयांनी वाढून 68,156 रुपये प्रत्येक किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याच्या दरात वाढ होऊन सोन्यचा दर 1,885 डॉलर प्रति औंस व चांदीचा दर 26.32 डॉलर प्रती औंस झाला. डॉलर कमकुवत झाल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढले आहेत.
त्याचबरोबर करोना व्हायरस खात्रीने आटोक्यात येण्याची शक्यता नजीकच्या भविष्यात नसल्याचे गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यामुळे शेअर निर्देशांकाबरोबरच काही प्रमाणात सोन्याचे दर वाढत असल्याचे वातावरण आहे, असे एचडीएफसी सिक्युरिटीचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.