कार कंपन्यांकडून दरवाढ

नवी दिल्ली – गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून रुपयाचे मूल्य अस्थिर आहे. कंपन्यांचा सुट्या भागाच्या आयातीचा खर्च वाढत आहे. त्यामुळे कार कंपन्या दरवाढ करू लागल्या आहेत.

मर्सिडिज-बेंझने सांगितले की, ऑक्‍टोबर महिन्यापासून काही मॉडेलच्या किमतीमध्ये दोन टक्‍क्‍यांनी वाढ करण्याचे ठरविले आहे. ज्या मॉडेलच्या किमतीत वाढ केली जाणार आहे ती मॉडेल दीड लाखापर्यंत महागात पडू शकतील, असे बोलले जाते.

या कंपनीच्या कारच्या किमती 40 लाखांपासून दीड कोटी रुपयांपर्यंत असतात. सध्या कारची फारशी विक्री होत नसल्यामुळे आम्ही ही दरवाढ टाळली होती. मात्र, रुपयाचे मूल्य कमी झाल्यामुळे आणि इतर कच्च्या मालाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे आम्हाला दरवाढ करावी लागत असल्याचे कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने बरीच वित्तीय उत्पादने सादर केली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.