आरक्षणाच्या नावाखाली शासनच भडकवतेय दंगली – राज ठाकरे

तरुणांनी हिंसाचारापासून दूर राहावे

पुणे – आरक्षणासाठी जाती-जातींत भांडणे लावत आणि विष कालवून आताचे आणि पूर्वीचेही शासनकर्ते समाजात विष कालवित आहे. सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही, तर शासन या आरक्षणाच्या नावाखाली शासनकर्ते दंगली भडकाविण्याचे काम करत आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केला. स्थानिकांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 80 ते 90 टक्के प्राधान्य दिल्यास कोणत्याही आरक्षणाची गरजच भासणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मनसेच्या वतीने शुक्रवारी पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ठाकरे बोलत होते. आमदार शरद सोनवणे, मनसेचे नेते बाबू वागसकर, सरचिटणीस नगरसेवक वसंत मोरे, अॅॅड. किशोर शिंदे, रिटा गुप्ता, मनसे शेतकरी सेनेचे अध्यक्ष बाबाराजे जाधवराव, शहराध्यक्ष अजय शिंदे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष ऍड. रुपाली पाटील-ठोंबरे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

सरकारी उद्योग बंद पाडण्याचा राज्यकर्त्यांचा डाव यशस्वी झाल्याने सरकारी रोजगारांच्या संधी जवळपास संपत आल्या आहेत. त्यामुळे आता केवळ खासगी क्षेत्रातील उद्योगच शिल्लक राहिले आहेत. यातही शासनकर्त्यांच्या आशीर्वादाने परप्रांतीयांची घुसखोरी सुरू आहे; असा आरोप करुन ठाकरे म्हणाले, आरक्षणाच्या नावाखाली शासनकर्ते समाजाचा विशेषत: तरुणांचा वापर केवळ दंगली घडवून आणण्यासाठी करुन घेत आहे. मराठा अथवा कोणत्याही समाजाला आरक्षण देण्याची शासनाची मानसिकता नाही, तर आरक्षणासाठी जातीजातीत भांडणे लावून शासनकर्ते समाजाच्या भावनांशी खेळत आहे.

देशातील सर्व उद्योगपती उद्योगांची उभारणी करण्यासाठी महाराष्ट्राला सर्वाधिक पसंती देत आहे. त्यामुळे या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. याचा विचार समाजाने विशेषत: तरुणांनी करून दंगल, हिंसाचारासारख्या प्रकारांपासून दूर राहावे, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

प्रत्येकाने ज्याचा त्याचा धर्म घरात सांभाळला, तर समाजात शांतता निर्माण होणार आहे. धार्मिक स्थळांवर स्पीकर लावण्याची आवश्‍यकता नाही. तसेच प्रार्थनेसाठी रस्ते बंद करण्याची कोणतीही आवश्‍यकता नाही.
– राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)