“आरआयएमसी’ प्रवेश परीक्षा पुढे ढकलली

1 व 2 डिसेंबर रोजी होणार हाेती; करोनामुळे पुढे ढकलण्याचा निर्णय

 

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने डेहराडून येथील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजसाठी प्रवेश पात्रता परीक्षा (आरआयएमसी) 1 व 2 डिसेंबर रोजी घेण्यात येणार होती. करोनामुळे ती पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

“आरआयएमसी’ परीक्षेचे वेळापत्रक आधीच जाहीर झाले आहे. यासाठी विद्यार्थ्यांना डेहराडून येथे स्पीड पोस्टाद्वारे डिमांट ड्राफ्ट पाठवून अर्ज मागविण्यासाठी मुदतही देण्यात आली होती. भरलेले अर्ज सादर करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत होती.

करोनामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा परिषदेकडे अर्ज दाखल करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्‍त तुकाराम सुपे यांनी स्पष्ट केले.

डिसेंबरमध्ये होणारी परीक्षाही लांबणीवर टाकली आहे. परीक्षेची पुढील तारीख नंतर कळविण्यात येणार आहे, असेही जाहीर केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.