IPL 2025 (Head coach of Punjab Kings) : पंजाब किंग्जने आयपीएल 2025 साठी ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंगची नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. पाँटिंग आता ट्रेव्हर बेलिसची जागा घेणार आहे, जो गेली अनेक वर्षे पंजाबचा प्रशिक्षक होता. पाँटिंगबद्दल सांगायचे तर, त्याने 2 महिन्यांपूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. आता त्याने पंजाब किंग्ज फ्रँचायझीसोबत 4 वर्षांचा करार केला आहे, जो 2028 मध्ये संपेल.
पंजाब किंग्जच्या कोचिंग आणि सपोर्ट स्टाफचे संपूर्ण नियंत्रण रिकी पाँटिंगच्या हाती दिले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र जुन्या कोचिंग स्टाफबाबत काय निर्णय घेतला जाणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पंजाबच्या जुन्या कोचिंग स्टाफमध्ये ट्रेवर बेलिस (मुख्य प्रशिक्षक), संजय बांगर (क्रिकेट विकास विभागाचे प्रमुख), चार्ल लँगवेल्ट (वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक) आणि सुनील जोशी (स्पिन गोलंदाजी प्रशिक्षक) यांचा समावेश होता. हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की पंजाबने गेल्या 7 हंगामात 6 प्रशिक्षक बदलले आहेत.
𝐏𝐔𝐍TER is 𝐏𝐔𝐍JAB! 🦁♥️
🚨 Official Statement 🚨
Ricky Ponting joins Punjab Kings as the new Head Coach! #RickyPonting #SaddaPunjab #PunjabKings pic.twitter.com/DS9iAHDAu7— Punjab Kings (@PunjabKingsIPL) September 18, 2024
गेल्या 17 वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवणार…?
पंजाब किंग्जच्या शेवटच्या मोसमाबद्दल बोलायचे झाल्यास, या संघाला साखळी टप्प्यात 14 सामने खेळल्यानंतर केवळ पाच वेळा विजय मिळवता आला. पंजाब गुणतालिकेत तळापासून दुसऱ्या स्थानावर होता. प्लेऑफच्या जवळ आल्यावर जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा पंजाबचा मोठा इतिहास आहे. इंडियन प्रीमियर लीगचे 17 सीझन संपले असले तरी या संघाचा विजेतेपदाचा दुष्काळ संपत नाही. आता पंजाबला प्रथमच आयपीएल चॅम्पियन बनवण्याची जबाबदारी रिकी पाँटिंगवर असेल.
पॉन्टिंगने 2014 मध्ये पहिल्यांदा प्रशिक्षकाची भूमिका बजावली, जेव्हा तो मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक झाला. त्यानंतर त्याने 7 वर्षे दिल्ली डेअरडेव्हिल्स/दिल्ली कॅपिटल्ससाठी काम केले आणि आता तो पंजाब किंग्जच्या रूपाने एका नवीन संघात सामील झाला आहे.