जळोची- सर्व रिक्षा परवानाधारकांनी त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी तात्काळ जोडणी करुन घ्यावे, जेणेकरुन सानुग्रह अनुदानाची रक्कम त्यांना वेळेवर अदा करता येईल.
त्याच प्रमाणे सदर प्रणाली तयार झाल्यानंतर उपरोक्त संकेतस्थळावर त्याची माहिती प्रदर्शित करण्यात येईल, जेणेकरुन सर्व रिक्षा बांधवांना त्याचा फायदा घेणे शक्य होईल, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, राजेंद्र केसकर यांनी केले आहे.