#Crime : प्रवासी महिलेची बॅग हिसकवणाऱ्या रिक्षा चालकाला अटक

पुणे – प्रवासी महिलेची जबरदस्तीने बॅग हिसकवणा-या रिक्षा चालकास युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून गुन्हयात वापरलेली रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे.
राहुल प्रकाश भोडणे (29 रा. म्हसोबा मंदीराजवळ टिळेकरनगर कोंढवा ) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 35 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिला कोंढव्यातील दिवाणी सोसायटीमागे रिक्षामधुन आली असताना रिक्षाच्या भाडे वरुन वाद झाला होता. यावेळी रिक्षा चालकाने महिलेची पर्स जबरदस्तीने हिसकावुन चोरुन नेली होती. त्याबाबत कोंढवा पोलीस ठाणेत रिक्षा चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाले पासुन आरोपी पोलीसांना गुंगारा देत होता.

दरम्यान गुन्हे शाखा युनिट 1 कडील अधिकारी व कर्मचारी पुणे शहरात घडलेले जबरी चोरीच्या गुन्हयांची माहिती घेण्याचे काम करीत होते. या घटनेची माहित घेत असताना आरोपी राहुल भोडणे हा वारंवार कामाची ठिकाणे व त्याच्या राहण्याची ठिकाणे बदलत होता. दरमन पोलीस अंमलदार अमोल पवार व इम्रान शेख यांना खबर मिळाली भोडणेच्या दुसऱ्या घराबाबत खात्रीशीर माहिती मिळाली.

त्यानूसार त्याला घरातून ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्हा केल्यानंतर सदर रिक्षा म्हसोबा मंदीराजवळ टिळेकरनगर येथे लपवुन ठेवली होती. ती रिक्षाही ताब्यात घेण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक शैलेश संखे, उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी पोलीस अंमलदार अमोल पवार, इम्रान शेख, अजय थोरात, तुषार माळवदकर, महेश बामगुडे, विजेसिंग वसावे, अय्याज दड्डीकर यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.