Multibagger Stock: शेअर बाजारातील काही ठराविक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा फायदा मिळतो. अनेक कंपन्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स आणि डिव्हिडेंडचे वाटप करतात. आता आणखी एका कंपनीने गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आहे रिचफील्ड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड.
रिचफील्ड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे (Richfield Financial Services Ltd) शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असल्यास तुम्हाला बोनस शेअर्सचा फायदा मिळू शकतो.
फायनान्शियल सर्व्हिस सेक्टरमधील स्मॉल कॅप कंपनी Richfield Financial Services Ltd लवकरच गुंतवणूकदारांना मोठे गिफ्ट देणार आहे. BSE फाइलिंगनुसार ही मल्टीबॅगर कंपनी पहिल्यांदाच गुंतवणूकदारांना 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स देणार आहे. गेल्या 2 वर्षांत या स्टॉकने तब्बल 1100% रिटर्न्स दिले आहेत.
कंपनी 10 रुपयांच्या फेस व्हॅल्यूवर प्रत्येक 1 इक्विटी शेअरच्या बदल्यात 10 रुपये फेस व्हॅल्यू असलेला 1 इक्विटी शेअर फ्रीमध्ये देईल. कंपनीने बोनस शेअरसाठी रेकॉर्ड डेट 14 फेब्रुवारी 2025 निश्चित केली आहे. म्हणजेच, जर तुमच्या डीमॅट खात्यात रेकॉर्ड डेटपर्यंत कंपनीचे स्टॉक असतील, तर कंपनी तुम्हाला त्यावर बोनस शेअर देईल. गेल्या वर्षी कंपनीने जुलै महिन्यात एका शेअरवर 0.80 रुपये डिव्हिडेंड दिला होता.
कंपनीच्या शेअर्सच्या कामगिरीबद्दल सांगायचे तर मागीलदोन वर्षात तब्बल 1100% रिटर्न्स दिले आहेत. तर शेअर्सची किंमत मागील वर्षभरात 390 टक्क्यांनी वाढली आहे. सध्या कंपनीच्या शेअरची किंमत 108.50 रुपये आहे. कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांतील उच्चांक 132.67 रुपये आणि 52 आठवड्यांतील नीचांक 22.12 रुपये आहे.
(नोंद – लेखामधील माहिती हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी वित्तीय सल्लागाराशी चर्चा करावी.)