ऋचाची “बिग मिस्टेक’

अभिनेत्री ऋचा चढ्ढा आता खेळाडू म्हणून “पंगा’ घेताना दिसणार आहे. “पंगा’ या बहुचर्चित चित्रपटात ती कंगना राणावतच्या समांतर भूमिकेत आहे. यानिमित्ताने बोलताना ऋचाने अलीकडेच एक मोठी खंत व्यक्‍त केली. ऋचा सांगते की, “गॅंग्स ऑफ वासेपूर’ हा चित्रपट करुन मी माझ्या आजवरच्या करिअरमधील सर्वांत मोठी चूक केली.


त्यावेळी माझे वय 24-25 वर्षे होते. असे असताना या चित्रपटात मी 42 वर्षे वयाच्या मनोज वाजपेयीच्या पत्नीची भूमिका केली. परिणामी चित्रपटात मी 37 वर्षांच्या नवाजुद्दीन सिद्दीकीची आई बनले. या चित्रपटामुळे माझे खूप मोठे नुकसान झाले. माझे खूप वय झाले आहे, असा अकारण लोकांचा समज झाला. त्यामुळे मला सातत्याने वयस्कर महिलांच्या व्यक्‍तिरेखांसाठी विचारणा होऊ लागली. आजही हा सिलसिला सुरू आहे.


माझ्या मते, आपण आपल्या अटींवर कामे स्वीकारल्यास तुम्ही नक्‍की यशस्वी होता. आज मी त्या टप्प्यावर हळूहळू पोहोचते आहे. मी आजही मला मिळालेल्या यशावर संतुष्ट नाही. सिनेसृष्टीने माझ्या व्यक्‍तिमत्वाची एकच बाजू पाहिली आहे.


माझ्याकडे अजूनही बरंच काही आहे. अनेक गुणवैशिष्टे आहेत. नव्या वर्षांत मी ती समोर आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. “पंगा’ हा चित्रपट माझ्या कारकिर्दीतील एक उत्तम चित्रपट आहे. या चित्रपटातून मी एक प्रगल्भ कलाकार म्हणून समोर येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.