रिचा चढ्ढाचा ‘शकीला’ सिनेमा ‘या’ दिवशी होणार रिलीज

करोना व्हायसरच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनंतर चित्रपटगृहे खुली करण्यात आली आहे. परंतु अनेक चित्रपट निर्माते अजूनही आपले बिग बजेट चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. 

याचा फायदा छोट्या चित्रपट निर्मात्यांना होत असून अनेक रखडलेल्या चित्रपटांना रिलीज होण्याची संधी मिळत आहे. त्यातच वर्षाअखेर ख्रिसमसनिमित्त कोणताही बिग बजेट चित्रपट रिलीज होत नाहीत. दुसरीकडे ओटीटी प्लॅटफॉर्मवर “कुली नं. 1’सारखे चित्रपट मोठे चित्रपट प्रदर्शित होत आहेत, परंतु चित्रपटगृहांना “शकीला’सारखे चित्रपट प्रदर्शित करून काम चालवावे लागणार आहे.

 ऍडल्ट स्टारवर आधारित असलेला “शकीला’ हा चित्रपट यंदा ख्रिसमसला रिलीज करण्यात येणार आहे. जो अनेक दिवसांपासून रखडलेला होता. या चित्रपटामध्ये रिचा चढ्‌ढ मुख्य भूमिकेत झळकणार आहे. दरम्यान, इंद्रजित लंकेश दिग्दर्शित या चित्रपटात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. आता “शकीला’ चित्रपटगृहात किती दर्शकांना आकर्षित करते हे पाहावे लागेल. 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.