रिचा चढ्ढावरही कास्टींग काउचचा प्रयोग

मुंबई : बिनधास्त अभिनेत्री अशी ओळख असणाऱ्या रिचा चढ्ढानेही तिच्यावर कास्टींग काऊचचा प्रयत्न झाला होता, असे सांगितले. तसेच याला कसे तोंड दिले हा अनुभवही तिने निवोदितांसाठी शेअर केलाय.

इंडस्ट्रीमधील सुरवातीच्या दिवसात इंडस्ट्रीमधील प्रस्थ असणाऱ्या व्यक्ती आपण जेवायला जाऊ असं विचारत. आधी मला याचा अर्थच माहित नव्हता. त्यामागचा उद्देशही कळत नव्हता. नंतर ते लक्षात यायला लागलं.

एक दोन वेळा मला लक्षात आलं नाही. मी खूप लहान आणि अल्लड होते. एकदा एक जण येऊन म्हणाला आपण जेवायला जायचं का? मी म्हणाले माझं जेवण झालं. एका कार्यक्रमात मला एक काका भेटले. जाहिरात क्षेत्राशी संबंधित होते. खोलीत ते म्हणाले, आपण जेवूया का? मी म्हणाले, मी तर जेवले. पण माझ्याकडे पनीर, दाल दही आणि रोटी आहे.

तो म्हणाला नाही नाही आपण जेवण करूयात. मी म्हणाले, माझ्याकडे लोणचे आणि पापड आहे. मग तो म्हणाला, नाही, आपण जेवूयात! असं म्हणात माझ्या हातावर हात ठेवून सुचवू लागला. मी म्हणाले ओह अंकल.

सुरवातीच्या दिवसातच नव्हे तर सध्याही अशा अयोग्य पुढाकाराशी सामना करावा लागतो. जर तुम्ही प्रस्थापित असाल आणि पुढाकार घेणाराही इंडस्ट्रीतील प्रस्थ असेल तर मीटूचे प्रकार घडतात. हे रोज घडणारे प्रकार थांबायला हवेत अशी अपेक्षाही तीने व्यक्त केली. मसान, सेक्‍शन 375, फुकरे यासह अनेक चित्रपटात रिचाने आपल्या अभिनयाने ठसा उमटवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.