काही दशकापूर्वी पुणे शहराची व्याप्ती वाढत असताना केवळ भौगोलिक बदल होत होते, नागरी सुविधा त्या प्रमाणात वाढत नव्हत्या, शहराचा आकार वाढत आहे. मात्र, नागरिकांच्या अनमोल जीविताच्या रक्षणासाठी आरोग्यसेवा विस्तारत नव्हती,
याची खंत डॉ. दिलीप माने व त्यांच्या नजीकच्या सहकाऱ्यांना कायम भेडसावत होती. पुणे शहराचा पूर्व भाग विस्तारत असताना आपण या भागातील लोकांना जागतिक पातळीवरील आरोग्य सुविधा व उपचार मिळावेत, या उद्दात हेतूंना
डॉ. माने यांनी सुरुवातीच्या काळात स्वप्न पाहिले, हे केवळ स्वप्नच नव्हे तर त्या स्वप्नांची पूर्ती व्हावी म्हणून अखंड धडपड चालू ठेवली. त्यांची धडपड पाहून त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक नामवंत आणि विशेषज्ञ डॉक्टर्स त्यांच्या मदतीसाठी सोबत राहिले.
“हाती घेतलेले कार्य तडीस नेणे’ हाच काय तो सर्वांचा हट्ट होता, मध्यवर्ती भागांत जागा शोधणे आवश्यक आर्थिक नियोजन करणे, सक्षम सहकारी असणे, तांत्रिक बाबींची पूर्तता होणे अशी अनेक आव्हाने समोर होती; परंतु नियतीला मान्य होते की ज्यांचा हेतू उदात्त आहे.
यांच्यासमोर आव्हाने कधीच निर्माण होत नाहीत. उलट त्या आव्हानांचे संधीत रूपांतर होते. असा दृढविश्वास ठेवणारे डॉ. दिलीप माने आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या मा. सतीश मगर व निष्णात टीमला हडपसरमध्ये अद्ययावत, जागतिक दर्जाचे नोबल हॉस्पिटल उभारण्याचे यश मिळाले आणि 7 जुलै 2007 रोजी हॉस्पिटलचे उद्घाटन झाले.
नोबल हॉस्पिटल हे पूर्व पुण्यातील 250 बेड्स असणारे पहिले एनएबीएच मान्यताप्राप्त रुग्णालय असून एकाच छताखाली विविध सुविधा देणारे सर्वात मोठे “सी ग्रीन ऑपरेशन थिएटर’ असलेले रुग्णालय आहे. तर नोबल हॉस्पिटल ऍनेक्स वर्ष 2015 मध्ये सुरू झाले. या ठिकाणी कर्करोग व डायलेसिससाठी 80 बेड्ससह सुसज्ज ऑपरेशन थिएटर आहे.
नोबल हॉस्पिटलची पॉलिक्लिनिकची एक समृद्ध साखळी आहे
– “नोबल मल्टिस्पेशालिटी क्लिनिक मगरपट्टा, अमनोरा
– नोबल ईओन खराडी (मल्टिनॅशनल कंपन्यांना आरोग्यसेवा पुरवणारे मल्टिपल वेलनेस क्लिनिक)
– नोबल पुरंदर
– नोबल समृद्धी, हडपसर याव्यतिरिक्त, ग्रॅनफिल्ड प्रकल्पदेखील आता येत आहेत. रुग्णांना परवडणाऱ्या किमतीत उच्च प्रतीची एकात्मिक आरोग्य सेवा पुरविणे हे रुग्णालयाचे ध्येय आहे.
हे ध्येय पुढे नेण्यासाठी रुग्णालय अनेक सीएसआर सामाजिक उपक्रम राबविते आणि अर्थपूर्ण मार्गाने समाजासाठी योगदान देते.
“नोबल’ फक्त आजारांवर उपचार करण्यापुरते मर्यादित नसून निरोगीतेसाठी उपयुक्त असे वातावरण निर्माण करते. “नोबल’चा आजपर्यंतचा प्रवास यशस्वी झाला आहे. नजीकच्या भविष्यात अधिक रोमांचक टप्पे अपेक्षित आहेत. आजवर “नोबल’ने समाजाभिमुख काम केले असून सदैव समाजहिताचे व सेवेचे व्रत अंगिकारले आहे.
गेल्या 14 वर्षांपासून “नोबल हॉस्पिटल’च्या यशात आणि विकासात सर्व सहकारी, कर्मचारी यांचे योगदान मोठे आहे. या वाटचालीत अनेक आपत्ती आल्या, स्वाईन फ्लू असो की करोनाचा कालखंड असो, “नोबल’ने अथकपणे सर्व काळात रुग्णांना सर्वोत्तम सुविधा आणि सेवा दिल्या आहेत.
करोनाचा कसोटी बघणारा कालखंड
करोनाकाळात देशांतीलच नव्हे, तर जगातील प्रत्येक जण करोनाशी लढत होता, युद्ध खेळत होता आणि ते युद्ध जिंकणे हे खूप महत्त्वाचे होते. जीव वाचवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य प्रत्येक जण यशस्वी करत असताना समाजाला आरोग्यसेवा देणारी हॉस्पिटल्सदेखील या युद्धात अग्रभागी होती.
हडपसर भागातील “नोबल हॉस्पिटल’ने तर या काळात महायुद्धात लढाई केल्यासारखी कामगिरी करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. प्रथमत: या रोगाची लक्षणे, व्याप्ती आणि उपचार याबाबत अनभिज्ञ असलेले प्रत्येक जण विवंचनेत असताना प्राथमिक लक्षणे जाणून संभाव्य रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात “नोबल’ची टीम कार्यरत होती.
“रोगापेक्षा इलाज भयंकर…’ अशी समाजमनांत एक प्रतिमा निर्माण झाली असताना “नोबल’ने पुढाकार घेऊन योग्य उपचारप्रणाली व स्वतंत्र इमारतीच्या माध्यमातून कोविड रुग्णांची देखभाल केलीच; शिवाय प्रत्येक रुग्णाला योग्य मार्गदर्शन करून “रोगापेक्षा इलाज सोपे आहेत’, अशी स्पष्ट प्रतिमा निर्माण करण्यात यश मिळवले. हे उत्तुंग यश असल्याचा अभिमान “नोबल’च्या प्रत्येक डॉक्टर आणि सर्व सहकारी टीमला आहे.
करोनाशी लढत असताना दूरदृष्टी ठेवून डॉ. माने आणि सर्व सहकारी टीमने तत्परतेने “नोबल ऍनेक्स’ या इमारतीमधून केवळ करोनाच्या रुग्णांसाठी समर्पित सेवा सुरू करून अन्य रुग्णांना कुठेही कसलीही बाधा होणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतली. संभाव्य धोके टाळण्यासाठी “नोबल’ने एक वेगळाच आदर्श निर्माण केला आणि जागतिक पातळीवरील संशोधन, सेवा आणि उपचारप्रणाली राबवली.
“नोबल’च्या प्रथितयश, अभ्यासू आणि चिकित्सक डॉक्टरांच्या टीमने जिद्दीने करोनाच्या प्रत्येक रुग्णावर तत्परतेने उपचार करून आपण एखाद्या असाध्य रोगावरसुद्धा जागतिक पातळीवरच्या दर्जाचे योग्य उपचार करू शकतो, याचा नवीन मापदंड निर्माण केला. जागतिक स्तरांवरील अनेक नामांकित आरोग्य संस्थांशी तंत्रज्ञानाने संपर्क करून एकमेकांच्या ज्ञानाचे आदान-प्रदान करून करोनावर मात करण्याचे यशस्वी प्रयत्न केले.
“जगदंबा प्रतिष्ठान’, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे व परिसरातील सर्व नगरसेवक अशा स्थानिक लोकप्रतिनिधींशी कायमचा संपर्क साधून स्थानिक पोलीस प्रशासनास तंदुरुस्त ठेवणे त्यांना 24 बाय 7 अशी सेवा देतानाच रुग्णाला तत्परतेने सेवा मिळावी, या उद्देशाने मोबाईल व्हॅनची सोय करून नागरिकांसोबतच पोलीस यंत्रणेचे मनोबल वाढविण्याचे कार्यही नोबलने यशस्वी करून “नोबल’ या नावाशी नाते यथार्थ केले आहे.
“नोबल हॉस्पिटल’चे एम.डी. डॉ. दिलीप माने, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. एच. के. साळे यांच्या नेतृत्वाखाली करोनाविरुद्धच्या युद्धात 5000 पेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार झोलेले आहेत.
करोनावर योग्य उपचार झालेले हजारो रुग्ण उपचारानंतर एक मोकळा श्वास घेऊन हसत घरी गेलेला तो क्षण म्हणजे नोबलच्या आरोग्यसेवेतील एक मानाचा तुरा आहे.
आर्मी विभागाकडून प्रशंसा
करोनाकाळात आदर्श आणि तत्परतेची रुग्ण सेवा दिल्याने “दक्षिण कमान’ या आर्मी विभागाकडून “नोबल’च्या उल्लेखनीय कामाबाबत प्रशंसा झाली. या सर्व यशामध्ये नोबलमधील सर्व डॉक्टर्स, परिचारिका, तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, हाऊसकीपिंग स्टाफ, सिक्युरिटीज, ऍम्ब्युलन्सचालक यावर नागरिकांचा श्वासोच्छ्वास सुरू असतो,
त्यासाठी अहोरात्र धडपड करणारे “नोबल’चे कर्मचारी कायम स्मरणात ठेवून आपले मार्गक्रमण करीत आहे. “नोबल’ची वचनबद्धता, समर्पण आणि करोनाच्या महामारीत सर्व टीमचे धैर्य वाखाणण्याजोगे होते. हॉस्पिटलचा प्रत्येक मेंबर या युद्धात आपले कर्तव्य पार पाडत असताना एक प्रकारे देशसेवाच करीत आहे,
अशा कर्तव्यभावनेने कर्तव्यात सामील होतो, याचा आम्हास अभिमान वाटतो, अशा शब्दांत “नोबल’ची टीम धन्यवाद व्यक्त करते. याशिवाय सर्वसामान्य रुग्णांना दिलासा देण्याचे महनीय कार्य “नोबल’द्वारे करण्यात आले. अतिशय नम्र सेवा आणि आवश्यक त्या सुविधांची त्वरेने पूर्तता करत, “नोबल हॉस्पिटल’ने वैद्यकीय सेवेचा एक आदर्श निर्माण केला. त्यामुळे महाराष्ट्रातही हॉस्पिटलचे नाव झाले, हे अभिमानाने नमूद करत आहे.
“सदैव सैनिका पुढेच जायचे…’
“नोबल’च्या टीममधील प्रत्येक सहकारी हा करोनायुद्धात कर्तव्याशी बांधिल राहून “सदैव सैनिका पुढेच जायचे…’ या अभिमानाने भविष्यात येणाऱ्या संकटांशीदेखील सामना करण्यास सज्ज राहील, याचा विश्वास प्रत्येक टीममधील सर्व सहकाऱ्यांना आहे.
हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी अल्ट्रासाऊंडमध्ये 4 डी इमेजिंग वापरत असलेल्या अत्यंत अत्याधुनिक उपकरण प्रख्यात आहे. रुग्णालयाने आरोग्य सेवेच्या अत्यंत हायटेक पद्धती एकत्रित केल्या आहेत, ज्याची उदाहरणे रोबोटिक असिस्टेड जॉइंट रिप्लेसमेंट, ईएनटी, जनरल सर्जरी आणि प्रोस्थेटिक यूरॉलॉजीसाठी वापरली जाणारी नवीन लिथो लेझर सिस्टमची उदाहरणे आहेत.
एक समर्पित क्लिनिकल रिसर्च टीम, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यता आणि चांगल्या परिभाषित प्रोटोकॉल्समुळे रुग्णालयांना नवीन उंची वाढविण्यात आणि रुग्णांच्या अपेक्षेप्रमाणे योग्य उपचार मिळण्यास मदत झाली. आज “नोबल हॉस्पिटल’ ही वैद्यकीय बंधुत्वाच्या विविध शाखांमधील डीएनबी विद्यार्थ्यांसाठी पसंतीचे हॉस्पिटल बनले आहे.