मांडवगण फराटा- नागरगाव (ता. शिरूर) येथील रेशनकार्ड धारकांनी त्यांना मिळालेल्या तांदळापैकी काही तांदूळ रेशनकार्ड नसलेल्या कुटुंबांना द्यावा, असे ग्रामपंचायतीच्या वतीने आवाहन करण्यात आले होते.याच आवाहनाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देत तब्बल एक टन तांदूळ जमा केला असल्याची माहिती सरपंच मनीषा शेलार यांनी दिली.
प्रतिमाणसी 3 किलोप्रमाणे एक टन तांदळाचे 310 व्यक्तींना सोशल डिस्टन्सचा नियम पाळून वाटप करण्यात आले. यावेळी घोडगंगाचे संचालक सुदाम साठे आणि सरपंच मनीषा शेलार यांच्या वतीने अर्धा किलो तेल व डाळीचे 103 कुटुंबाना वाटप करण्यात आले. यावेळी उपसरपंच वैजयंता पवार, तलाठी दीपक गांगुर्डे, ग्रामसेवक झुंबर होळकर, माजी उपसरपंच कमलाकर साठे, सोसायटीचे अध्यक्ष कुंडलिक साठे, पुनमचंद शेलार, रामभाऊ साठे,ग्रामपंचायत सदस्य एकनाथ शेलार, किसन शेलार, पोलीस पाटील बाबासाहेब शेलार उपस्थित होते.