मुंबई – बॉलीवूड स्टार सुशांतसिंह राजपूतने 14 जून रोजी आत्महत्या केल्याने चित्रपटसृष्टीसह अनेकांना धक्का बसला. या आत्महत्येनंतर संपूर्ण देशातून प्रतिक्रिया उमटत आहेत. सुशांत त्याच्या मागे अनेक न सुटलेले प्रश्न सोडून गेला आहे.
आज सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला आज एक महिना पूर्ण झाला. आज सगळेच सुशांतला मिस करत आहेत. दरम्यान, आता सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री ‘रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रिया चक्रवर्ती ही सुशांतची जवळची मैत्रीण होती. सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती हिनेही अभिनेत्याच्या आठवणीत एक भलीमोठी पोस्ट लिहिली आहे.
रियाने लिहिले आहे की,’मी तुला कधीच स्वत:पासून वेगळं करू इच्छित नव्हती. पण आता आपण कधीच भेटू शकणार नाही, तरी आयुष्यभर तुझ्यावर असेच प्रेम करत राहिल असे रियाने लिहिले आहे.’ सध्या तिच्या या पोस्टवरून तिला चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे. सोशल मीडियावर पोस्ट करण्यापूर्वी रिया चक्रवर्तीने तिचा व्हॉटअॅप डिपी बदलला आहे. तिच्या डीपीवर सुशांतचा एका तिचा एक सुंदर फोटो तिने लावला आहे.