मुंबई – अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती यालाही आज मुंबईच्या विशेष न्यायालयातून जामीन मंजूर झाला. सुमारे तीन महिने तो कारागृहात होता. सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरणातील मादक द्रव्य प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती.
शोविक चक्रवर्ती आणि सुशांतसिंहचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा यांन एनसीबीने 4 सप्टेंबर रोजी अटक केली होती. त्यांच्यावर मादक द्रव्य प्रकरणात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात एनसीबीने रियालाही अटक करून सुमारे महिनाभर कारागृहात ठेवले होते.
तथापि त्या प्रकरणात पुढील तपासात नेमकी काय प्रगती झाली हे मात्र अजून पुढे आलेले नाही. सुशांतसिंह प्रकरणात सीबीआयकडून तपास सुरू आहे. पण त्या तपासातील प्रगतीही अजून समजलेली नाही.