मुंबई – दीपाली चव्हाण नावाच्या एका महिला वन अधिकाऱ्याने केलेल्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील उप वन संरक्षक विनोद शिवकुमार याला शुक्रवारी अटक केली गेली. त्याला सकाळीच्या दरम्यान नागपुर रेल्वे स्थानकावर ताब्यात घेण्यात आले.
यातच मिळालेल्या माहितीनुसार, आज वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाच DFO विनोद शिवकुमार यांना धारणी पोलिसांनी न्यायालयात आणलं गेलं. यावेळी न्यायालयाच्या बाहेर वनविभागातील महिला कर्मचाऱ्यांची शिवकुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
दीपालीच्या आत्महत्या प्रकरणात व्याघ्र प्रकल्पाचे संचालक एन श्रीनिवास रेड्डी यांच्याही अटकेची मागणी तिच्या कुटुंबियांनी व तिच्या पाठीराख्यांनी केली असून या प्रकरणात त्यांनी जोरदार निदर्शनेही केली होती.
या दोन्ही आरोपींनी तिची सतत अवहेलना केल्यामुळेच वैतागून दीपालीने आत्महत्या केली असल्याचा तिच्या कुटुंबियांचा आरोप आहे. स्वत: दीपाली हीनेही मृत्यूपुर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात तिने विनोद शिवकुमार आणि संचालक श्रीनिवास यांनी आपल्याला त्रास दिल्याचे म्हटले होते.