केंद्रप्रमुख, पर्यवेक्षकांवर जबाबदारी : अहवालही सादर करावा लागणार
अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करणार
समजपूर्वक वाचन, विरामचिन्हयुक्त वाक्यांचे लेखन यांची तर गणित विषयामध्ये दुसरीसाठी वजाबाकी, तिसरीसाठी गुणाकार, चौथी ते आठवीसाठी भागाकार हा उच्चस्तराची फेरपडताळणी करण्यात येणार आहे. येत्या 19 ते 23 ऑगस्ट दरम्यान फेरपडताळणी करण्यात यावी, निवडलेल्या शाळेतील उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी फेरपडताळणी करावी लागणार आहे. यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात येणार आहे.
पुणे – इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनस्तर निश्चितीची फेरपडताळणी करण्यात येणार आहे. याची जबाबदारी केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक यांच्यावर सोपविण्यात आली असून अहवालही सादर करावा लागणार आहे.
पुणे जिल्ह्यातील मराठी व उर्दू माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील मराठी, उर्दू, इंग्रजी, गणित या विषयांमधील काही मूलभूत क्षमतांच्या अध्ययन स्तर कोणता आहे याची निश्चिती करण्याबाबतचे कामकाज राबविण्यात आले.
या माहितीवर आधारित प्रत्येक मूल संबंधित मूलभूत कौशल्याचा उच्चतम अध्ययन स्तर प्राप्त करेल यासाठी मूलनिहाय कृती आराखडा वर्ग पातळीवर शिक्षकांनी तयार करून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
पुणे जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या प्राचार्य डॉ. कमलादेवी आवटे यांनी अध्ययनस्तर निश्चितीची फेरपडताळणी करण्याबाबतच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.