केरोसिनचे सुधारित दर जाहिर

मुंबई : नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून केरोसिनचे दरासंदर्भात माहिती नुकतीच प्रसिद्ध केली आहे.

मुंबईसाठी, (मुंबई शहर व मुंबई उपनगर) केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक 01 जून 2021 पासून लागू करण्यात येतील. किरकोळ विक्रीचा सध्याचा दर (रुपये प्रति लिटर) 36.87 इतका तर सुधारित दर 39.45 इतका आहे.

शासन परिपत्रक क्र. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग क्रमांक-केईआर-1376/3769/सतरा, दि. 17 डिसेंबर 1976 नुसार पुर्णांकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. अशी माहिती कैलास पगारे, संचालक, नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.