आमदार भेगडेंनी घेतला विकासकामांचा आढावा

मावळ तालुक्‍यातील विकासकामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे फर्मान
वडगाव मावळ –
येथील मावळ पंचायत समितीच्या सभागृहात मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी सोमवारी (दि. 27) आयोजित केलेल्या आढावा बैठकीत मावळ तालुक्‍यामधील प्रलंबित असलेली कामे त्वरित मार्गी लावण्याच्या सूचना आमदार बाळा भेगडे यांनी दिल्या.

मावळ तालुक्‍यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, एनएनयूटीआय योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ तसेच रूरबन विकास योजनेमधील विविध प्रलंबित विकास कामांसंदर्भात आमदार बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत अधिकारी यांच्यात चर्चा करण्यात आली. मावळ तालुक्‍यातील मंजूर कामांची निविदास्तरावरील प्रकिया तात्काळ पूर्ण करून सबंधित खात्यातील प्रलंबित असलेली विकासकामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी आमदार बाळा भेगडे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

या वेळी उपसभापती जिजाबाई पोटफोडे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, गणेश धानिवले, सरचिटणीस बाबूलाल गराडे, तुंग ग्रामपंचायत सरपंच वसंत म्हसकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किरण राक्षे, शंकर देशमुख, सरपंच नामदेव बगाड आदी उपस्थित होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.