पंजाब सीमेवर लष्कर प्रमुखांकडून संरक्षण सज्जतेचा आढावा

अमृतसर : पंजाब सीमेवर जाऊन लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी लष्कराच्या सज्जतेचा आढावा घेतला. अमृतसर आणि फिरोझपूरदरम्यान वज्र जवानांशी त्यांनी संवाद साधला, अशी माहिती लष्कराच्या वतीने देण्यात आली.

सोमवारी नरवणे यांनी जम्मू ते पठाणकोट भागातील सीमावर्ती भागात जाऊन कमांडर्स आणि जवानांशी संवाद साधला होता. त्यांच्या मंगळवारच्या भेटीत त्यांच्यासोबत लेफ्ट. जनरल आर पी. सिंग होते.

लेफ्ट. जनरल संजीव शर्मा यांनी नरवणे यांना सीमेवरील परिस्थितीची माहिती दिली. यावेळी त्यांनी जवानांशीही संवाद साधला. शौर्य आणि सेवेवरील निष्ठेसाठी दिल्या जाणाऱ्या कमेंडेशन कार्डही त्यांनी प्रदान केले. यावेळी करोनाविरोधातील लढ्यात लष्कर देत असलेल्या सहभागाचे नरवणे यांनी कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.