अकोले विधानसभा मतदारसंघातील निवडणूक खर्च निरीक्षक देबाशीश बॅनर्जी यांनी निवडणूक खर्च विषयक आढावा घेतला. अकोले तालुक्यातील विधानसभा मतदारसंघातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली.
सदर बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश कांबळे, सचिनकुमार पटेल, सचिन कोष्टी व प्रवीण गोसावी, पोलीस निरीक्षक अकोले, सहा. पोलीस निरीक्षक राजूर, घारगाव पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अकोले, निवडणूक कामी नियुक्त कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये आजपावेतो झालेल्या सर्व कामकाजाच्या पूर्वतयारीबाबत आढावा घेतला. तसेच, उमेदवाराला खर्चासंबंधी स्वतंत्र खाते उघडणे, दररोज निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक आहे. तसेच निवडणूक खर्चाबाबत सर्व पथक प्रमुख व उपस्थितांना मार्गदर्शन केले.