मुंबईतील पावसाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

मुंबई – काल (सोमवार) सकाळपासूनच सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण मुंबई जलमय झाली आहे. यामुळे महानगरीतील वाहतुक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये 2, 4 आणि 5 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

दरम्यान, मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाला भेट दिली व मुंबईच्या परिस्थितीचा आढावा घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.